Department of Marathi

महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच मराठी विभाग कार्यरत आहे. महाविद्यालयात बी.ए.भाग १ व बी. ए. भाग २ या वर्गांना मराठी विषयाचे अध्यापन केले जाते. प्रारंभी काही वर्षे प्रा. अधिकराव पोळ यांनी मराठी विभागाची धुरा सांभाळली. एप्रिल १९९९ पासून प्रा. श्यामसुंदर मिरजकर यांनी मराठी विभागाचा कार्यभार सांभाळला. ५ सप्टेंबर २००७ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून डॉ. सयाजीराजे मोकाशी यांची नियुक्ती झाली. तेही मराठी विषयाचे होते. विशेष म्हणजे डॉ. सयाजीराजे मोकाशी व डॉ. श्यामसुंदर मिरजकर हे दोघे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी, लेखक व समीक्षक म्हणून ओळखले जातात. प्राचार्य डॉ. मोकाशी यांचा कार्यकाल ३१ मे, २०२३ रोजी संपला. महाविद्यालयाचा मराठी विभाग हा सातत्याने साहित्य व संस्कृतीच्या क्षेत्रात कार्यरत आहे. महाविद्यालयाने सलग १३ वर्षे मराठी युवा ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. तसेच एक राष्ट्रीय चर्चासत्र व इतर काही कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. संशोधनपर लेखन व प्रकल्प याबाबतही मराठी विभाग अग्रेसर आहे.

Vision, Mission & Goal

दृष्टी (Vision)
१. मराठी भाषा आणि मराठी साहित्य यांचे अध्ययन-अध्यापन व संशोधन करणे.

ध्येय (Mission)
१. विद्यार्थ्यांमध्ये मराठीची भाषिक कौशल्ये विकसित करणे.
२. विद्यार्थ्यांमध्ये ‘मराठीतून व्यवहारोपयोगी लेखन’ व ‘सर्जनशील लेखन’ या कौशल्यांचा विकास घडविणे.
३. विद्यार्थ्यांमध्ये साहित्यविषयक अभिरुची, सौंदर्यात्मक जाणीव व समीक्षा दृष्टी विकसित करणे.
४. उद्योग, व्यवसाय आणि दृक्श्राव्य प्रसारमाध्यमे यांच्या भाषिक गरजा पूर्ण करतील, असे विद्यार्थी घडविणे.
५. प्रमाण मराठी भाषा व तिच्या विविध बोली यांचे आकलन, संकलन व संवर्धन करणे.

उद्दिष्टे (Goals)
१. विद्यार्थ्यांमध्ये साहित्यविषयक आकलन आणि सौंदर्यजाणिवा विकसित करणे.
२. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे.
३. विद्यार्थ्यांमध्ये भाषेच्या माध्यमातून सूक्ष्म कौशल्ये आणि साहित्याच्या माध्यमातून नैतिक, सामाजिक जीवनमूल्ये रुजविणे.
४. मराठी भाषा आणि साहित्यविषयक संशोधनासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करणे.
५. मराठी भाषेतून भावी शिक्षक, प्राध्यापक, तसेच प्रशासकीय अधिकारी घडावेत म्हणून स्पर्धापरीक्षा व व्यवसाय विषयक मार्गदर्शन करणे.
६. भाषा व साहित्य यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे

Toggle Content
Toggle Content
Toggle Content
Toggle Content
Toggle Content
Toggle Content
Toggle Content
Toggle Content
Toggle Content
Toggle Content

Faculty

Principal, Dr. Mokashi Sayajiraje Appasaheb - View Profile​

Prof.Dr.,Mirajkar Shyamsundar Baburao