कला व वाणिज्य महाविद्यालय मायणी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी
महाविद्यालयामध्ये मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर , 2023 रोजी सकाळी ठीक दहा वाजता ग्रंथालयामध्ये मा. प्रभारी प्राचार्य , डॉ शोकतअली सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली . याप्रसंगी प्रा. डॉ. हेमांगीनी माने आणि विद्यार्थीनी प्रतिनिधी पौर्णिमा कुलाळ यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले .यावेळी प्रा. शिवशंकर माळी यांनी मनोगत व्यक्त करून महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार सर्वांसमोर व्यक्त केले . तसेच उपस्थित सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. प्राध्यापक मनोज डोंगरदिवे सर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले .